बुधवार, ३० नोव्हेंबर, २०१६

अनंत कुलकर्णी यांचे फेसबुक वरील ब्लॉग्स.

मुद्दाम शोधून वाचावेत आणि डोक्यात घोळवत राहावेत असे काही ब्लॉग्स

ताई


तुम्ही धरण बांधायला काढलं. म्हटला आमचं गाव बुडणार. मग आमचं घरदार, जमिनी बुडवल्या नि एका गावच्या पाच पन्नास लोकांना अनोळखी उंबर्‍यांच्या पाच-पन्नास गावांत विखरून टाकलेत. तुटपुंज्या मोबदल्यासाठी आणि सुपीक जमिनीच्या बदल्यात मिळणारा वांझ जमिनीचा तुकडा पदरी पाडून घेण्यासाठी आयुष्यभराची वणवण पाठी लावली. धरणाच्या पाठीमागच्या टेकाडावार फार्म हाऊस बांधून काढणारे नक्की कुठून उगवले आम्हाला कळलंही नाही. आम्ही विचारलं, *'असं का?'*


*तुम्ही म्हणालातः देशाचा विकास व्हायचा तर कुणीतरी त्याग करायलाच पाहिजे.*

काल एका मेडीकल स्टोअरवर औषधी घेण्यासाठी मी उभा होतो.
त्या बाबांची अडचण किती गंभीर होती व नड किती शुल्लक होती.
त्यांनी त्यावर संयमाने किती सहज मार्ग काढला.
परीस्थीतीचा बाऊ नाही, दुकानदारावर राग नाही,
व्यवस्थेविरुद्ध त्रागा नाही.
आहे ती परीस्थिती स्विकारुन बाबांनी आपले प्राधान्यक्रम ठरवले होते.
माय महत्वाचीच, पण त्या स्थितीत त्यांना लेकराची अधिक काळजी होती.

सेल्समन


तो जाताना बघत क्षणभर विचार करत बसलो, या पोराकडे शहरातल्या कित्येक पोरांपेक्षा केवढ्या गोष्टी जास्ती आहेत?


याला पैशांची किंमत समजते, आई कष्ट करून घर चालवते त्याची जाणीव आहे. स्वतः शिकत नसला तरी बहिणीचे शिक्षण पूर्ण करायची अक्कल आहे. पुढे काय करायचं त्याचा प्लानिंग तयार आहे. आज हा पोरगा कष्ट करून एवढे पैसे कमावतोय, आपल्याकडे १२ वर्षांच्या एखाद्या मुलाला चाळीस हजार नुसते मोजायला सांगितले तरी नीट जमतील की नाही शंका आहे.


पण आपल्याकडे कष्ट करून पैसे कमावणाऱ्या व्यक्तींपेक्षा, नुसतेच बडेजाव दाखवणाऱ्याची चलती जास्ती असते.


'गेट-टूगेदर'


यथाअवकाश भल्या मोठठ्या घरात आपण एकटच उराव
आणि रिकाम्या वेळी आठवणीनी 'गेट-टूगेदर'साठी चल म्हणाव!

पदराने ताटवाट्या पुसत स्वैपाकघरातून आई सर्वांना बोलवायची
"तू पण बस जेवायला" अस रोज एकदा तरी आजी तिला म्हणायची!


कधीकधी केराचा डबाही


कधीकधी केराचा डबाही,
मला मनापेक्षा बरा वाटतो.
दिवसातून एकदा का होईना,
निदान तो रिकामा तरी होतो..

आपण मात्र मनात किती,
दुःखद आठवणी साठवतो.
काय मिळवतो यातून आपण?
स्वतःचे दुःखच नुसते वाढवतो..

असे अनेक .....

बुधवार, १६ नोव्हेंबर, २०१६

जास्त दराचे प्रलोभन दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये.

अत्यंत महत्वाची टिपणी. सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी ही विनंती.



आमचे मित्र अंकुशराव औटी पैठण तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी आहेत. गावाकडे चाललेले  व्यवहार पाहून त्यांनी शेतकऱ्यांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.




५००/१००० रू.च्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर उदभवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारने युध्द पातळीवर काम करावे आणि जागरूक नागरिकांनी सामान्य जनतेसाठी काम करावे.काही व्यापारी याचा गैरफायदा घेण्याची दाट शक्यता आहे.कापूस ऊत्पादक शेतकर्‍यांना याचा फटका बसला आहे.अनेक कापूस व्यापारी व खरेदीदार जून्या रद्द झालेल्या नोटा घेणार असाल तर जास्त दर देण्याचे प्रलोभन शेतकर्‍यांना दाखवत आहेत. किंबहूना रद्द झालेल्या नोटांसाठी आग्रही आहेत.अनेक शेतकरी यात बळी पडण्याची शक्यता आहे. काही शेतकरी या व्यापार्‍यांच्या जाळ्यात अडकले देखील आहेत.वास्तविक ही फसवणूकच आहे. सामान्य जनता, शेतमजूर,शेतकरी यांच्या मजबूरीचा फायदा घेण्यासाठी समाजातील काही घटक सक्रिय झाले आहेत. समाजातील काही अडाणी व अज्ञानी लोकांची फसवणूक होणार नाही यासाठी जागरूक व जाणकार नागरिकांनी पुढे येणे आवश्यक आहे.आतापर्यंत नागरिकांनी खूपच संयम दाखविला आहे तेव्हा शासनाने लोकांना त्वरित सर्व प्रकारच्या नवीन नोटा (१०,२०,५०,१००,५००,२०००) उपलब्ध करून द्यावात आणि नोटा बदली संबधात यापूढे मुदत वाढवू नये.

अंकुश औटी, औरंगाबाद.